नमस्कार शेतकरी मित्रांनो! तुम्ही तुमच्या शेतात कांदा लावला आहे, पण तुम्हाला चिंता आहे की कांद्याची साईज हवी तशी वाढेल की नाही? अनेकदा आपण खतांचे नियोजन करतो, पण एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपले दुर्लक्ष होते, आणि ती म्हणजे कांद्याची ‘पात’..
होय, हे खरं आहे! जर तुम्हाला जमिनीखालील कांद्याचा आकार वाढवायचा असेल, तर जमिनीवरील पातींची संख्या वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जेवढी जास्त पात, तेवढीच कांद्याची मान (Neck) मजबूत बनते आणि पर्यायाने कांद्याची साईज मोठी होते. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की, कांद्याची पात वाढवण्यासाठी नेमकी कोणती फवारणी करावी, ज्यामुळे तुमचे उत्पादन नक्कीच वाढेल.. चला तर मग जाणून घेऊया.
कांद्याची पात वाढवण्यासाठी ‘फॉस्फरस’ची जादू
कांदा पिकाला नवीन पालवी फुटण्यासाठी आणि पातींची संख्या वाढवण्यासाठी ‘फॉस्फरस’ (Phosphorus) या अन्नद्रव्याची नितांत गरज असते. जमिनीतून दिलेल्या खतांपैकी फॉस्फरस अनेकदा पिकाला वेळेवर उपलब्ध होत नाही, आणि त्यामुळे पातींची वाढ खुंटते. यावर उपाय म्हणून आपण पानांवाटे (फवारणीद्वारे) फॉस्फरस देणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
कोणती फवारणी करावी?
कांदा पिकाची पात वाढवण्यासाठी आणि मान जाड करण्यासाठी खालील कॉम्बिनेशनचा वापर करा:
मुख्य औषध: यारा कंपनीचे ‘सेनिफॉस’ (Seniphos).
हे लिक्विड स्वरूपातील फॉस्फरस (२३%) आहे.
प्रमाण: १५ लिटरच्या पंपासाठी ४० मिली.
सोबतीला टॉनिक: यासोबत कोणतेही सीव्हीड (Seaweed) अर्क असलेले टॉनिक वापरा.
उदा. ‘बायोविटा एक्स’ (BioVita X) किंवा ‘सागरिका’ (Sagarika).
प्रमाण: १५ लिटरच्या पंपासाठी ४० मिली.
थोडक्यात डोस: १५ लिटर पाण्यात ४० मिली सेनिफॉस + ४० मिली बायोविटा/सागरिका.
येथे वाचा – शासनाने पैसे पाठवले, पण खात्यात जमा नाही? 90% शेतकरी ही गोष्ट तपासतच नाहीत
फवारणीची योग्य वेळ
ही फवारणी तेव्हाच सर्वात जास्त रिझल्ट देते जेव्हा तुमचे कांदा पीक साधारणपणे ३० दिवसांचे असते. ही पिकाच्या वाढीची अवस्था असते, आणि यावेळी फॉस्फरस मिळाल्यास नवीन पाती जोमाने बाहेर येतात. शेतकरी मित्रांनो, शेतीत टायमिंगला खूप महत्त्व आहे. जर ३०-३५ दिवसांची वेळ निघून गेली, तर या फवारणीचा हवा तसा फायदा मिळणार नाही. त्यामुळे वेळापत्रक पाळा आणि वेळेवर फवारणी घ्या.
येथे वाचा – नवीन वर्षात रेशनमध्ये मोठा बदल! आता एवढं धान्य मिळणार..
जर तुम्हाला कांद्याचे रेकॉर्डब्रेक उत्पादन घ्यायचे असेल, तर पातींच्या संख्येवर काम करा. वर दिलेल्या फवारणीचा नक्की प्रयोग करा आणि तुमच्या कांद्याची साईज वाढलेली अनुभवा!