शासनाने पैसे पाठवले, पण खात्यात जमा नाही? 90% शेतकरी ही गोष्ट तपासतच नाहीत

Government Subsidy : शेतकरी मित्रांनो, आपण महाडीबीटी (MahaDBT) वर अर्ज करतो, लॉटरी लागते, सर्व कागदपत्रेही वेळेत देतो… पण तरीही बऱ्याचदा सबसिडीचे पैसे खात्यात जमाच होत नाहीत. आपण विचार करतो की, माझं तर पीक कर्ज (Crop Loan) निल आहे, मग अडचण कुठे आली? तर मंडळी, अडचण तुमच्या पीक कर्जात नाही, तर तुम्ही घेतलेल्या इतर ‘बिनशेती’ कर्जात असू शकते! नेमकं काय प्रकरण आहे आणि बँकांचे हे NPA चे गणित कसे काम करते? हे समजून घेण्यासाठी हा ब्लॉग नक्की वाचा.

नमस्कार शेतकरी बांधवांनो! सध्या राज्यभरात अनेक शेतकऱ्यांची एकच तक्रार आहे – “माझी निवड झाली आहे, पूर्वसंमती मिळाली आहे, पण अनुदान काही जमा होत नाहीये.” जर तुमचीही हीच समस्या असेल, तर हे नीट वाचा. बहुतेक शेतकरी सोसायट्यांचं किंवा बँकेचं पीक कर्ज (Crop Loan) वेळेवर भरतात. कारण आपल्याला माहित असतं की पीक कर्ज वेळेत भरलं तरच पुढच्या हंगामात नवीन कर्ज मिळतं आणि व्याजात सवलत मिळते. पण, अनेकदा आपण शेती व्यतिरिक्त इतर कामांसाठी सुद्धा बँकेकडून कर्ज घेतो. उदा. घर बांधण्यासाठी, गाडी घेण्यासाठी किंवा इतर वैयक्तिक कारणांसाठी (Term Loan / Personal Loan).

नेमकी अडचण काय होतेय?

आता बँकांनी वसुलीसाठी थोडं कडक धोरण अवलंबलं आहे. बातमी अशी आहे की, जर एखाद्या शेतकऱ्याने पीक कर्ज पूर्ण भरलं असेल, पण त्याच्याकडे इतर कोणतंही ‘बिनशेती कर्ज’ (Non-Agricultural Loan) थकीत असेल, तर बँक त्या शेतकऱ्याचे खाते NPA (Non-Performing Asset) म्हणून घोषित करत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही ट्रॅक्टर घेतला असेल किंवा घरासाठी कर्ज काढलं असेल आणि त्याचे हप्ते थकले असतील, तर बँक तुम्हाला ‘डिफॉल्टर’ समजते.

येथे वाचा – नवीन वर्षात रेशनमध्ये मोठा बदल! आता एवढं धान्य मिळणार..

याचा सबसिडीवर काय परिणाम होतो?

महाडीबीटी पोर्टलवरून मिळणारे अनुदान थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात (DBT) जमा होत असते. पण जेव्हा तुमचे खाते NPA होते किंवा बँकेकडून त्यावर निर्बंध (Hold) लावले जातात, तेव्हा शासनाकडून आलेले अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यात जमा होत नाहीत. अनेकदा ते पैसे परत जातात (Reverse Transaction) किंवा बँकेच्या सिस्टीममध्ये अडकून पडतात.

येथे वाचा – कांदा होईल टरबुजासारखा! उन्हाळी कांद्यासाठी पहिला खताचा बेसल डोस..

बँका असं का करतात?

बँकेचा नियम सरळ आहे – जर ग्राहकाकडे कोणतीही थकबाकी असेल, तर ती वसूल करण्यासाठी बँक आलेल्या पैशांवर टाच आणू शकते किंवा खाते गोठवू शकते. त्यामुळे तुमचं शेतीचं रेकॉर्ड कितीही स्वच्छ असलं, तरी इतर कर्जाची थकबाकी तुम्हाला महागात पडू शकते.

शेतकऱ्यांनी काय करावे?

१. जर तुमचं अनुदान अडकलं असेल, तर सर्वात आधी बँकेत जाऊन तुमच्या सर्व खात्यांची चौकशी करा.
२. तुमचं एखादं जुनं बिनशेती कर्ज थकीत आहे का ते तपासा.
३. जर शक्य असेल तर त्या कर्जाचे हप्ते नियमित करा किंवा वन टाईम सेटलमेंट (OTS) बाबत बँकेशी चर्चा करा.
४. जोपर्यंत खात्यावरील ‘NPA’चा शिक्का पुसला जात नाही, तोपर्यंत सबसिडी जमा होण्यात अडचणी येऊ शकतात.
त्यामुळे शेतकरी मित्रांनो, फक्त पीक कर्जच नाही, तर इतर कर्जांकडेही दुर्लक्ष करू नका. बँकेचा व्यवहार चोख ठेवा, जेणेकरून हक्काचे अनुदानाचे पैसे वेळेत हातात मिळतील.. ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांच्या ग्रुपवर नक्की शेअर करा.

येथे वाचा – बियाण्यासाठी निधी मंजूर.. उद्यापासून या जिल्ह्यांत भुईमूग–तीळ बियाणे वाटप सुरू होणार..

Leave a Comment

Join WhatsApp Group