Cotton MSP : तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी आहात का? आणि तुम्हाला तुमच्या पांढऱ्या सोन्याला, म्हणजेच कापसाला खाजगी बाजारापेक्षा चांगला आणि सुरक्षित भाव हवा आहे? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. शासनाच्या हमीभाव केंद्रावर कापूस विक्रीसाठी नोंदणी करण्याची मुदत आता संपत आली आहे. हाताशी फक्त काहीच दिवस उरले असताना, नुकसान टाळण्यासाठी काय करावे? जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
नमस्कार शेतकरी बांधवांनो, यंदाचा कापूस हंगाम जोरात सुरु आहे, पण बाजारात मिळणारा भाव आणि शासनाचा हमीभाव यात तफावत असल्याने अनेक शेतकरी संभ्रमात असतात. जर तुम्हाला तुमचा कापूस शासनाच्या हमीभाव केंद्रावर (CCI किंवा पणन महासंघ) विकायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. कारण, हमीभाव दराने कापूस विक्रीच्या नोंदणीसाठी आता केवळ शेवटचे 6 दिवस शिल्लक राहिले आहेत. होय, तुम्ही बरोबर वाचले! ३१ डिसेंबर ही नोंदणीसाठीची अंतिम मुदत असू शकते, त्यामुळे आता विचार करत बसण्याची वेळ निघून गेली आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
सध्या खाजगी बाजारात कापसाचे दर कमी-जास्त होत असतात. अनेकदा खाजगी व्यापारी कापसाच्या गुणवत्तेचे किंवा ओलाव्याचे कारण पुढे करून कमी दरात कापूस मागीततात. अशा वेळी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने कापसाला ‘किमान आधारभूत किंमत’ (MSP) जाहीर केली आहे. परंतु, या हमीभावाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा कापूस शासकीय खरेदी केंद्रावर नेण्यापूर्वी ‘नोंदणी’ (Registration) करणे बंधनकारक आहे. आणि या नोंदणीची मुदत आता संपत आली आहे.
येथे वाचा – 70 रुपये टोमॅटो, 100 रुपये कांदा… तरीही रांगा!पुण्याच्या शेतकऱ्यांचा नवा प्रयोग..
नोंदणी कुठे आणि कशी करायची?
शेतकरी मित्रांनो, नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. तुम्हाला लांबच्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
मोबाईल ॲप: तुम्ही घरबसल्या ‘कपास किसान’ (Kapas Kisan App) या मोबाईल ॲपद्वारे तुमची नोंदणी पूर्ण करू शकता.
थेट केंद्र: जर तुम्हाला ॲप वापरणे जमत नसेल, तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या जवळच्या हमीभाव खरेदी केंद्रावर जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आपली नोंदणी करून घेऊ शकता.
येथे वाचा – सोयाबीन, कापूस विमा कधी जमा होणार? सरसकट पीकविमा मिळणार का? जाणून घ्या..
हे काम का महत्त्वाचे आहे?
सुरक्षित दर: हमीभावामुळे तुम्हाला बाजारातील चढ-उताराचा फटका बसत नाही.
हक्काचे पैसे: शासनाकडून मिळणारे पैसे सुरक्षित आणि थेट बँक खात्यात येतात.
व्यापाऱ्यांच्या मनमानीला चाप: नोंदणी केल्यामुळे तुम्हाला खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावात कापूस विकण्याची सक्ती राहणार नाही.
येथे वाचा – कांद्याला हेक्टरी 90 हजार रुपये मदत; सरकारची नवीन योजना.. असा घ्या लाभ..
अनेकदा “उद्या करू, परवा करू” म्हणत शेवटची तारीख निघून जाते आणि मग पश्चात्ताप करण्याची वेळ येते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन आणि संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ३१ डिसेंबरची वाट न पाहता आजच आणि आताच आपली नोंदणी पूर्ण करावी.
तुमच्या गावातील इतर शेतकरी मित्रांनाही ही माहिती द्या. तुमचा कष्टाचा कापूस मातीमोल भावाने विकला जाऊ देऊ नका.