30 जूनच्या आत कर्जमाफी नाही झाली तर… बच्चू कडूंनी सांगितला पुढचा प्लॅन..

Crop Loan Update : शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एकाच विषयाची चर्चा जोरात सुरू आहे, ती म्हणजे ‘शेतकरी कर्जमाफी’. सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत, पण जर दिलेल्या मुदतीत शब्द पाळला नाही तर काय? या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे. शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला एक गंभीर इशारा दिला आहे. रेल्वेचे चाक थांबवण्यापासून ते गनिमी काव्यापर्यंतच्या या लढ्याची पुढची दिशा काय असेल, हे जाणून घेणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे आहे. चला तर मग, जाणून घेऊया नेमकं काय शिजतंय शेतकरी आंदोलनाच्या पटलावर..

कर्जमाफीचे गाजर की ठोस निर्णय?

नमस्कार, आपल्या सर्वांना माहिती आहेच की मागील काही काळात शेतकऱ्यांचे अभूतपूर्व आंदोलन झाले. या आंदोलनाची धग इतकी होती की, जे सरकार कर्जमाफीचा विचार २०२९ च्या निवडणुकीत करेल असं वाटत होतं, त्या सरकारला तातडीने हालचाली कराव्या लागल्या.

३० जून: निर्णायक तारीख

सरकार हालचाली करत असलं तरी शेतकऱ्यांच्या मनात “सरकारने शब्द फिरवला तर?” ही शंका कायम आहे. याच मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारले की ३० जूनपर्यंत कर्जमाफी झाली नाही तर काय? तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर सरकारची झोप उडवणारे आहे.
बच्चू कडू यांच्या शब्दांत सांगायचे तर, “जर ३० जूनच्या आत कर्जमाफी झाली नाही, तर रुळावर माणसं दिसणार नाहीत, पण रेल्वेचे एकही चाक पुढे सरकणार नाही. हा एक नवीन चमत्कार देशाला पाहायला मिळेल.”

येथे वाचा – आता घरबसल्या पिक कर्ज मिळणार.. या जिल्ह्यासाठी सुविधा सुरू.. पहा अर्ज कसा करायचा?

गनिमी कावा आणि सरकारला इशारा

बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये प्रत्यक्ष जाऊन रेल्वे रुळांची पाहणी केली आहे. त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दात सुनावले आहे की, तुम्ही कितीही पोलीस बळ वापरा किंवा यंत्रणा लावा, एकदा शेतकऱ्याने ठरवलं तर रेल्वे रोखणं कुणालाच शक्य होणार नाही.
सध्या फक्त “ट्रेलर” दाखवला गेला आहे, पण “पिक्चर” अजून बाकी आहे. बच्चू कडू यांनी सांगितले की, आंदोलनाची खरी रणनीती (अंदर की बात) अजून उघड केलेली नाही. हा गनिमी कावा सरकारला भारी पडू शकतो. जर सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, तर १ जुलैला संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी पेटून उठेल, असा कडक इशारा देण्यात आला आहे.

येथे वाचा – शेत जमीन खरेदीसाठी अनुदान; तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर.. इथे डाउनलोड करा अर्ज

Leave a Comment

Join WhatsApp Group