MHADA Pune Lottery 2025 : पुण्यात स्वतःचं हक्काचं घर असावं, हे अनेकांचं स्वप्न असतं. म्हाडाच्या लॉटरीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो आणि आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. म्हाडा पुणे लॉटरी २०२५ ची प्रारूप यादी (Draft List) प्रसिद्ध झाली आहे आणि या यादीने काही धक्कादायक तर काही सुखद खुलासे केले आहेत. जिथे एका घरासाठी शेकडो लोक रांगेत आहेत, तिथे काही नशीबवान अर्जदार असे आहेत ज्यांनी सोडत निघण्यापूर्वीच बाजी मारली आहे! तुमचा अर्ज नक्की कोणत्या प्रोजेक्टमध्ये आहे आणि तिथे स्पर्धा किती आहे? चला, जाणून घेऊया सविस्तर…
म्हाडा लॉटरी २०२५: स्पर्धेचे चित्र स्पष्ट!
नमस्कार मित्रांनो! म्हाडाच्या पुणे लॉटरी प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीनुसार, आपल्याला कोणत्या स्कीममध्ये किती स्पर्धा आहे, याचा अंदाज आला आहे. (लक्षात ठेवा, ही प्रारूप यादी आहे, त्यामुळे अपात्र अर्ज बाद झाल्यानंतर अंतिम यादीत थोडेफार बदल होऊ शकतात.)
पण सर्वात आधी, एका विशेष ‘लकी विनर’ बद्दल बोलूया, ज्यांचं नशीब पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
नशीबवान विजेते: सोडतीआधीच मिळालं घर
काही अर्जदारांचे नशीब इतके जोरावर असते की त्यांना स्पर्धेची चिंताच नसते. अनिता अशोक फड या अशाच एक नशीबवान विजेत्या ठरल्या आहेत. त्यांनी ‘म्हाडा कर्मचारी’ (ME) कॅटेगरीमधून अर्ज केला होता.
विशेष काय घडले? कुमार पार्क रेसिडन्सी (स्कीम ८६५) मध्ये ME कॅटेगरीसाठी ३ घरे राखीव होती, पण अर्ज आला फक्त १. त्यामुळे तिथे त्या आपोआप विजेत्या ठरल्या. इतकेच नाही, तर ‘द रायजिंग’ (स्कीम ८७९), किवळे येथील २ बीएचके फ्लॅटसाठीही त्या विजेत्या ठरल्या आहेत. एकाच वेळी दोन ठिकाणी सोडतीपूर्व विजेते होणे, ही खरोखरच दुर्मिळ गोष्ट आहे!
सिडकोची बंपर ऑफर! फ्लॅटमागे चक्क 10 लाखांचा फायदा..
कुमार पार्क रेसिडन्सी (हडपसर) – इथे आहे खरी लढाई..
हडपसरमधील या स्कीममध्ये (स्कीम ८६५) १ बीएचकेसाठी प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे.
जनरल पब्लिक: इथे एका घरासाठी तब्बल ८८९ अर्ज आले आहेत. म्हणजे स्पर्धा किती कठीण आहे याचा विचार करा!
इतर कॅटेगरीमध्येही (DT, EX) एका घरासाठी ३०-४० अर्ज आले आहेत.
उलटपक्षी, आमदार-खासदार (MP/MLA) कोट्यातील ३ घरांसाठी इथे शून्य अर्ज आले आहेत.
सिडकोची बंपर ऑफर! फ्लॅटमागे चक्क 10 लाखांचा फायदा..
मोशी आणि बावधनमधील परिस्थिती
नेक्सस प्राईम स्क्वेअर, मोशी (स्कीम ८७७): इथे २ बीएचके घरांसाठी जनरल पब्लिकच्या १० जागांसाठी १०८३ अर्ज आले आहेत. म्हणजे इथेही स्पर्धा सोपी नाही.
न्याती इक्विनॉक्स २, बावधन (स्कीम ८१७): इथे जनरल पब्लिकच्या एका घरासाठी ६१७ जणांनी नशीब आजमावले आहे. मात्र, इथेही MP/MLA, म्हाडा कर्मचारी आणि डिफेन्स (DF) या कॅटेगरीजसाठी एकही अर्ज आलेला नाही, त्यामुळे या जागा रिक्त राहिल्या आहेत.
जिथे एकही अर्ज आला नाही…
काही स्कीम्स अशा आहेत जिथे आरक्षित जागांसाठी अर्जच आलेले नाहीत. उदाहरणार्थ:
मृणालिनी ए टाईप (चिखली – स्कीम ८२४): इथे जेआर (JR), फ्रीडम फायटर (FF) आणि माजी सैनिक (EX) या कॅटेगरीसाठी शून्य अर्ज आले आहेत.
बावधन आणि हडपसरमध्येही काही विशिष्ट आरक्षित जागांसाठी अर्जदार मिळालेले नाहीत.
मित्रांनो, या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की ‘जनरल पब्लिक’ कॅटेगरीमध्ये घरासाठी प्रचंड स्पर्धा आहे, तर काही आरक्षित प्रवर्गांमध्ये अर्जच आलेले नाहीत. ज्यांनी कमी गर्दीच्या स्कीममध्ये किंवा आरक्षित प्रवर्गातून अर्ज भरले आहेत, त्यांची घर मिळण्याची शक्यता अधिक आहे.