कांदा बियाणे घरीच असे तयार करा; पहा घरगुती बियाण्याचे फायदे..

Onion seeds at Home : बाजारातील महागड्या कांदा बियाण्यांवर पैसे खर्च करूनही पदरी निराशाच पडतेय? बोगस बियाण्यांमुळे संपूर्ण पीक वाया जाण्याची भीती वाटते? तर हा लेख तुमच्यासाठीच आहे! जाणून घ्या, अगदी घरच्या घरी, कमी खर्चात आणि १०,०००% खात्रीशीर कांदा बियाणे तयार करण्याची यशस्वी पद्धत. चला, स्वावलंबी होऊया..

दरवर्षी कांदा लागवडीचा सीजन आला की आपली धावपळ सुरू होते ती बियाणे शोधण्यासाठी. बाजारात मिळणाऱ्या महागड्या बियाण्यांवर आपण हजारो रुपये खर्च करतो. पण अनेकदा काय होतं? उगवण क्षमता कमी निघते, किंवा पीक आल्यावर कळतं की बियाणे भेसळयुक्त होते. कधी डेंगळे येतात, तर कधी अपेक्षित कलर येत नाही. थोडक्यात काय, तर आपल्या कष्टाच्या पैशाचा जुगार होतो. यावर उपाय काय? उपाय अगदी सोपा आहे – “आपलं बियाणं, आपला विकास!”

आज आपण पाहूया की, नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान घरच्या घरी, अत्यंत साध्या पद्धतीने दर्जेदार कांदा बियाणे कसे तयार करायचे.

येथे वाचा – नमो शेतकरी योजनेचा 8 वा हप्ता खात्यात कधी पडणार? या 6 लाख शेतकऱ्यांचा ‘पत्ता कट’..

१. योग्य कांद्याची निवड: यशाची पहिली पायरी
बियाणे तयार करण्यासाठी जेव्हा तुम्ही ‘गोट कांदा’ (Mother Bulb) निवडाल, तेव्हा कोणतीही तडजोड करू नका. तुमच्या साठवणुकीतील असे कांदे निवडा जे:
आकाराने एकसारखे गोल आणि गरगरीत आहेत.
ज्यांचा रंग गडद लाल आणि चकाकीत आहे.
जे निरोगी आणि टणक आहेत.
लक्षात ठेवा, “आई तशी लेक आणि बी तसं पीक!” जर गोट कांदा चांगला असेल, तरच पुढच्या वर्षीचं उत्पादन बक्कळ मिळेल.

२. लागवडीची खास पद्धत
निवडलेले कांदे थेट जमिनीत लावण्यापूर्वी एक छोटी ट्रिक वापरा. कांद्याचा वरचा भाग (शेंडीकडचा भाग) सुरीने कापून घ्या. यामुळे कोंब लवकर आणि जोमदार बाहेर येतात.
अंतर: दोन कांद्यांमध्ये साधारणपणे एक ते दीड वितीचे अंतर ठेवा.
कांदा जमिनीत लावताना तो अर्धा मातीत आणि अर्धा वर राहील किंवा व्यवस्थित गाडला जाईल अशा बेताने लावा आणि पाणी द्या.

३. मधमाशी हीच खरी सोबती
कांद्याला जेव्हा डेंगळे (फुलोरा) येतात, तेव्हा एक गोष्ट कटाक्षाने पाळा. या पिकावर अतिशय जहाल किंवा हाय-पॉवरची कीटकनाशके फवारू नका. का? कारण कांद्याचे परागीभवन (Pollination) होण्यासाठी मधमाशी शेतात येणे अत्यंत गरजेचे असते. जर तुम्ही कडक औषध मारले, तर मधमाशी येणार नाही आणि बियाणे पोसणार नाही किंवा ते पोचट राहील. त्यामुळे बुरशीनाशक किंवा अगदी साधी औषधे वापरा, पण मधमाशीला जपून!

येथे वाचा – शेतकऱ्यांनो! आजच करा हा अर्ज.. अन्यथा 2 हजाराचा हप्ता बंद होईल.. पहा अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे

४. घरगुती बियाण्याचे फायदे

तुम्ही आज जी मेहनत घ्याल, ती पुढच्या वर्षी तुम्हाला भरभरून नफा देईल.
खात्रीशीर दर्जा: तुम्हाला माहित असते की तुम्ही कोणत्या कांद्यापासून बी बनवले आहे.
पैशांची बचत: कंपन्यांच्या महागड्या पिशव्या विकत घेण्याची गरज नाही.
फसवणूक टळते: दुबळ कांदा किंवा कलर न येण्याची समस्या उद्भवत नाही.

टीप: ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास इतर शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा.

येथे वाचा – शेतात पीक नाही.. अशी होणार ई-पीक पाहणी; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑफलाईन नोंद..

Leave a Comment

Join WhatsApp Group