E Peek Pahani : तुमची ई-पीक पाहणी मुदतीत करायची राहून गेली आहे का? आता काळजी करण्याचे कारण नाही! राज्य शासनाने शेतकऱ्यांना शेवटची संधी दिली असून आता तुम्ही ‘ऑफलाईन’ पद्धतीने पिकाची नोंद करू शकता. अर्ज कोणाकडे करायचा? शेवटची तारीख काय? आणि प्रक्रिया कशी असेल? जाणून घेण्यासाठी हा सविस्तर लेख नक्की वाचा.
शेतकरी मित्रांनो, नमस्कार.. ई-पीक पाहणी संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक अडचणी, अतिवृष्टी किंवा इतर काही कारणांमुळे आपल्या अनेक शेतकरी बांधवांची ई-पीक पाहणी करायची राहून गेली होती. पीक पाहणी झाली नाही तर पिकविमा, सरकारी योजना किंवा अतिवृष्टीची मदत मिळण्यात अडचणी येतात, हे आपण जाणतोच.
पण आता घाबरून जाण्याचे कारण नाही! जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी नवीन मार्गदर्शक सूचना (SOP) जारी केल्या असून, ज्यांची ऑनलाईन नोंदणी राहिली आहे, त्यांना आता ‘ऑफलाईन’ पद्धतीने नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे. चला तर मग, ही संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊया.
या तारखेपर्यंत मुदत..
सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ कमी आहे. १४ डिसेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार, तुम्हाला ऑफलाईन अर्जासाठी १७ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२५ ही वेळ देण्यात आली आहे. म्हणजेच तुमच्याकडे हाताशी फक्त काही दिवस शिल्लक आहेत.
येथे वाचा – शेतकऱ्यांनो! पिक विमा निधी आला; पहा पिक विमा कधी मिळणार?
अर्ज कोणाकडे करायचा? (प्रक्रिया)
शासनाने यासाठी प्रत्येक गावासाठी एक ‘ग्रामस्तरीय समिती’ स्थापन केली आहे. या समितीकडे तुम्हाला लेखी अर्ज करायचा आहे.
समितीमध्ये कोण असणार?
अध्यक्ष: मंडळाधिकारी (Circle Officer)
सदस्य: तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक.
तुम्हाला तुमच्या तलाठी किंवा कृषी सहाय्यकाकडे जाऊन एक साधा लेखी अर्ज द्यायचा आहे. अर्जामध्ये पुढील माहिती स्पष्ट लिहा: (१) तुमचे नाव, (२) गट नंबर / सर्व्हे नंबर, (३) पिकाचे नाव, (४) लागवड केलेले क्षेत्र
शेतात पीक नाही.. अशी होणार ई-पीक पाहणी
हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला असेल की, “आम्ही पीक कापून विकले सुद्धा, आता रिकाम्या रानाची पाहणी कशी करणार?” तर मित्रांनो, काळजी नको. ही ग्रामस्तरीय समिती २५ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान पडताळणी करेल. जर शेतात पीक नसेल, तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे विचारपूस करून किंवा स्थानिक माहितीच्या आधारे तुमच्या पिकाची शहानिशा केली जाईल आणि पंचनामा करून नोंद घेतली जाईल.
येथे वाचा – गव्हाचे फुटवे वाढवण्यासाठी घरगुती उपाय; गव्हाला फुटवेच फुटवे.. पहा शून्य खर्चाचा भन्नाट प्रयोग..
संपूर्ण वेळापत्रक एका नजरेत
शासनाने ही प्रक्रिया १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे:
शेतकऱ्यांनी अर्ज करणे: १७ ते २४ डिसेंबर २०२५
समितीने पडताळणी/स्थळ पाहणी करणे: २५ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६
अहवाल तहसील कार्यालयात पाठवणे: ७ जानेवारीनंतर
जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम अहवाल: १३ ते १५ जानेवारी २०२६
१५ जानेवारीनंतर जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून तुमच्या सातबारावर या पिकांच्या अधिकृत नोंदी घेतल्या जातील.
ई-पीक पाहणी का महत्त्वाची आहे?
केंद्राच्या ‘ॲग्रीस्टॅक’ उपक्रमांतर्गत पिकांची अचूक माहिती असणे बंधनकारक आहे. जर तुमची पीक पाहणी नसेल तर:
हमीभावाने (MSP) शेतमाल विकताना अडचणी येऊ शकतात (उदा. कापूस, सोयाबीन).
अतिवृष्टी झाल्यास मिळणारे अनुदान अडकू शकते.
कांदा चाळ किंवा विहीर अनुदानासारख्या योजनांचा लाभ घेताना सातबारावर नोंद नसेल तर अर्ज बाद होतो.
(उदा. २०२५ मध्ये विहिरी खचल्याचे ३० हजारांचे अनुदान अनेकांना फक्त नोंदी नसल्याने मिळाले नाही.)
सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. या रब्बी पिकांची ई-पीक पाहणी सुद्धा वेळीच करून घ्या. तसेच, तुमच्या शेतातील विहीर, बोअरवेल किंवा फळबागांच्या नोंदी सातबारावर आहेत का ते तपासा. नसतील तर या प्रक्रियेद्वारे त्या अद्ययावत करून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणत्याही सरकारी मदतीपासून तुम्ही वंचित राहणार नाही.
वेळ खूप कमी आहे.. आजच आपल्या तलाठी भाऊसाहेबांशी किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क साधा आणि २४ डिसेंबरच्या आत तुमचा अर्ज सादर करा.
ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांना आणि इतर शेतकरी व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचीही मदत बुडणार नाही!
येथे वाचा – कांद्याचे विक्रमी उत्पादन हवेय? मग ‘ही’ आंतरमशागत देईल 100% रिझल्ट!