हरभरा दुसरी फवारणी; भरघोस फुलधारणा.. मर रोग आणि अळी 100% खल्लास..

Harbhara Dusri Phavarani : शेतकरी मित्रांनो, तुमचा हरभरा ३५ ते ४० दिवसांचा झाला आहे का? पिकाला कळी लागायला सुरुवात झाली आहे? जर हो, तर ही वेळ आहे पिकाच्या दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या फवारणीची! फुलांची संख्या दुप्पट करण्यासाठी आणि अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमकी कोणती औषधे वापरावीत? जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.

सध्या सर्वत्र हरभरा पिकाची स्थिती बघितली तर बहुतांश शेतकऱ्यांचे पीक हे ३५ ते ४० दिवसांच्या टप्प्यावर आले आहे. ज्यांची लागवड थोडी लवकर झाली होती, त्यांच्या प्लॉटमध्ये तर आता २ ते ४ टक्के फुलधारणा (Flowering) दिसायलाही लागली असेल.

अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, हा काळ हरभरा पिकाचा “टर्निंग पॉईंट” आहे. आपण पहिली फवारणी फुटवे वाढवण्यासाठी घेतली होती, पण आता ही दुसरी फवारणी खालील तीन उद्देशांसाठी अत्यंत गरजेची आहे:

१. भरघोस फुलधारणा होण्यासाठी: जेवढी जास्त फुले, तेवढे जास्त उत्पादन.
२. मर रोगावर (Wilt) नियंत्रण मिळवण्यासाठी: जमिनीत ओलावा असल्याने बुरशीचा अटॅक होऊ शकतो.
३. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी: सध्या ढगाळ वातावरणामुळे काळ्या अळीचा किंवा शेंडे खाणाऱ्या अळीचा उपद्रव वाढू शकतो.
​त्यामुळेच, एकाच फवारणीत या तिन्ही समस्यांवर उपाय करणारे कॉम्बिनेशन आपल्याला वापरायचे आहे. चला तर मग पाहूया, १५ लिटरच्या पंपासाठी आपल्याला नेमका काय डोस घ्यायचा आहे.

१. जबरदस्त टॉनिक (फुलधारणेसाठी)
​या अवस्थेत पिकाला ताकदीची गरज असते. फुलांची गळ होऊ नये आणि कळी जोमदार निघण्यासाठी बायो-स्टिम्युलंट (Bio-stimulant) वापरणे फायद्याचे ठरते.
• ​शिफारस: ‘पाटील बायोटेक’चे ‘झकास गोल्ड’ (Zhakas Gold).
• ​प्रमाण: १५ लिटर पाण्याला फक्त ५ मिली. (हे तुरीमध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट देते).

२. बुरशीनाशक (मर रोगासाठी)
​बऱ्याच ठिकाणी हरभऱ्यात अजूनही मर रोग (झाड वाळणे) दिसून येत आहे. हे रोखण्यासाठी साधे बुरशीनाशक न वापरता थोडे चांगले कॉम्बिनेशन वापरा. खालीलपैकी कोणतेही एक बुरशीनाशक तुम्ही निवडू शकता:
• ​पर्याय क्र. १:रिडोमिल गोल्ड (Ridomil Gold) – यामध्ये मेटलॅक्सिल आणि मॅन्कोझेब हे घटक आहेत.
• ​प्रमाण: १५ लिटर पाण्याला ४० ग्रॅम.
• ​किंवा
• ​पर्याय क्र. २:स्प्रिंट (Sprint) – यामध्ये कार्बेन्डाझिम आणि मॅन्कोझेब हे घटक आहेत. हे मर रोगावर अतिशय प्रभावी काम करते.
• ​प्रमाण: १५ लिटर पाण्याला २५ ग्रॅम.
(टीप: रिडोमिल किंवा स्प्रिंट यांपैकी कोणतेही एकच औषध वापरा.)

३. अळीनाशक (सुरक्षेसाठी)
​सध्या अळी दिसत नसली तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किंवा काळ्या अळीचा नायनाट करण्यासाठी अळीनाशक घेणे मस्ट आहे. भविष्यात येणाऱ्या घाटे अळीला रोखण्याचे काम हे आताच करेल.
• ​पर्याय क्र. १: ज्यामध्ये ‘इमामेक्टिन बेंजोएट ५% एसजी’ (Emamectin Benzoate) हा घटक आहे, असे कोणतेही औषध. उदा. प्रोक्लेम (Proclaim) किंवा ईएमओ (EMO).
• ​प्रमाण: १५ लिटर पाण्याला १० ते १२ ग्रॅम.
• ​किंवा
• ​पर्याय क्र. २: ‘पाटील बायोटेक’चे ‘फोकलँड’ (Fockerland).
• ​प्रमाण: १५ लिटर पाण्याला २५ मिली.

येथे वाचा – हरभरा मर रोगावर 100% इलाज; पहा हरभऱ्यावरील बुरशी कशी थांबवावी?

महत्त्वाची टीप:
​औषध पानांवर जास्त वेळ टिकून राहावे आणि पावसाचा किंवा दवाचा परिणाम होऊ नये म्हणून सिलिकॉन बेस स्टिकर (उदा. ब्लेस सुपर) १५ लिटर पंपाला ५ मिली नक्की वापरा. शेतकरी मित्रांनो, एक चांगले टॉनिक (झकास गोल्ड) + एक बुरशीनाशक (स्प्रिंट किंवा रिडोमिल) + एक अळीनाशक (प्रोक्लेम किंवा फोकलँड) आणि सोबत स्टिकर, अशी ही तुमची दुसरी फवारणी असली पाहिजे.
​ही फवारणी वेळेवर घ्या आणि आपल्या हरभरा पिकाचे होणारे नुकसान टाळा. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा.

महत्त्वाचे : कोणतीही फवारणी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा..

Leave a Comment

Join WhatsApp Group