जानेवारीपासून रेशन वाटपात बदल होणार; ‘आता’ एवढे धान्य मिळणार..

Ration scheme : नवीन वर्षासोबत रेशन वाटपात मोठा बदल होणार आहे. जानेवारीपासून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याच्या प्रमाणात बदल करण्यात येणार असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. नेमकं किती धान्य मिळणार? कोणाला जास्त तर कोणाला कमी? चला जाणून घेऊया कोणाला किती धान्य मिळणार..

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत रेशन धान्याच्या वाटपात पुन्हा एकदा बदल होणार आहेत. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मासिक धान्याच्या प्रमाणात जानेवारी २०२६ पासून नवे नियोजन लागू केले जाणार आहे. या नव्या निर्णयानुसार, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रती कार्ड २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ३ किलो तांदूळ व २ किलो गहू देण्यात येणार आहे.

मुळात हेच प्रमाण लागू होते. मात्र, काही काळापूर्वी पुरवठा विभागाने त्यात बदल करून अंत्योदयासाठी २५ किलो तांदूळ व १० किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ४ किलो तांदूळ व १ किलो गहू असे वाटप सुरू केले होते.

येथे वाचा – हवामानात अचानक बदल; अवकाळी पाऊस पडणार का?.. पहा नवीन हवामान अंदाज

जानेवारी २०२६ पासून पुन्हा लागू होणारे प्रमाण

१. अंत्योदय कार्डधारक : प्रती शिधापत्रिका २० किलो तांदूळ + १५ किलो गहू
२. प्राधान्य कुटुंब : प्रती सदस्य ३ किलो तांदूळ + २ किलो गहू

दरम्यान, डिसेंबर २०२५ साठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्या महिन्यासाठी सध्या सुरू असलेलेच प्रमाण लागू राहणार आहे. म्हणजेच, अंत्योदयसाठी २५ किलो तांदूळ व १० किलो गहू, तसेच प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ४ किलो तांदूळ व १ किलो गहू याच प्रमाणात रेशन वाटप केले जाणार आहे.

येथे वाचा – अर्ध्या खर्चात वांग्याची शेती; ही ट्रिक बनवेल मालामाल..

Leave a Comment

Join WhatsApp Group