कांद्याला हेच खत वापरा आणि भरघोस उत्पादन मिळवा.. पहा उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन..!

उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन : उन्हाळी कांदा हे कमी पाणी, जास्त काळजी आणि अचूक खत व्यवस्थापन मागणारे पीक आहे. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खतांचा वापर केला, तर कांद्याचा कंद जाड, वजनदार, चकचकीत आणि साठवणुकीला टिकाऊ बनतो. अनेक वेळा उत्पादन चांगले येते, पण चुकीच्या खत वापरामुळे कांदा साठवणीत खराब होतो. हे टाळण्यासाठी खत व्यवस्थापनाचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते.

खत व्यवस्थापनाचे योग्य नियोजन का आवश्यक आहे?

उन्हाळी कांद्याचा कालावधी साधारण १२० ते १४० दिवसांचा असतो. त्यामुळे संपूर्ण हंगामात एकाच वेळी खत दिल्यास त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. म्हणूनच खत व्यवस्थापन दोन टप्प्यांत करणे गरजेचे आहे.

पहिला खत डोस – लागवडीच्या वेळी (मुळांची मजबूत वाढ)

लागवडीच्या सुरुवातीच्या टप्प्यात कांद्याला मुळांची पकड बसण्यासाठी आणि पातीची चांगली वाढ होण्यासाठी स्फुरद (Phosphorus) अत्यंत आवश्यक असते. या टप्प्यावर योग्य खत दिल्यास पुढील वाढ मजबूत होते.

लागवडीच्या सुरुवातीला कांद्याची मुळे मजबूत बसावीत आणि पातीची वाढ चांगली व्हावी यासाठी पहिला खत डोस अत्यंत महत्त्वाचा असतो. यासाठी प्रति एकर १०:२६:२६ हे खत ७५ किलो (शिफारस केलेले) वापरता येते. पर्याय म्हणून २०:०:१३, १४:३५:१४ किंवा १२:३२:१६ यापैकी कोणतेही एक खत वापरू शकता. या मुख्य खतासोबत TSP (ट्रिपल सुपर फॉस्फेट) २५ ते ३० किलो मिसळावे, ज्यात ४६ टक्के फॉस्फरस असून तो मुळांचा विकास झपाट्याने करतो. तसेच सल्फर १० किलो वापरल्यास कांद्याचा रंग, चकाकी आणि साठवण क्षमता वाढते. हा संपूर्ण खत डोस लागवडीच्या वेळी किंवा पहिल्या पाण्यासोबत देणे अधिक फायदेशीर ठरते.

येथे वाचा – शेतकऱ्यांनो! खतांचे भाव वाढले; पहा सर्व खतांच्या किमती..

दुसरा खत डोस – ३० ते ४० दिवसांनी (कंद पोषण आणि आकार वाढ)

लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी देण्यात येणारा दुसरा खत डोस कांद्याच्या कंद पोषणासाठी आणि आकार वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या टप्प्यावर कांद्याची मान जाड होते आणि कंद भरून येण्यास सुरुवात होते, त्यामुळे पालाश (Potash) ची गरज सर्वाधिक असते. यासाठी मुख्य खत म्हणून १०:२६:२६ – ७५ किलो, किंवा १४:३५:१४ – २ बॅग, किंवा १२:३२:१६ – १.५ ते २ बॅग यापैकी कोणतेही एक वापरता येते. यासोबत MOP (म्युरेट ऑफ पोटॅश) २५ किलो देणे आवश्यक असून त्यामुळे कांद्याची साईज, वजन आणि घट्टपणा वाढतो. शक्य असल्यास सल्फर १० किलो वापरल्यास कांद्याची टिकवण क्षमता आणि एकूण दर्जा अधिक सुधारतो..

महत्त्वाची सूचना (शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेची)

दुसऱ्या खत डोसमध्ये युरिया, २४:२४:० किंवा डीएपी (DAP) वापरणे टाळावे. या टप्प्यावर नत्राचा (Nitrogen) अतिवापर झाल्यास कांदा पाणचट होतो, साठवणीत कुजण्याचे प्रमाण वाढते आणि परिणामी बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे कंदाची गुणवत्ता आणि टिकवण क्षमता राखण्यासाठी दुसऱ्या डोसमध्ये नत्रयुक्त खते देणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

येथे वाचा – शेतकऱ्यांनो! खतांचे भाव वाढले; पहा सर्व खतांच्या किमती..

योग्य खत व्यवस्थापनाचे फायदे

योग्य आणि नियोजनबद्ध खत व्यवस्थापन केल्यास कांद्याचा कंद मोठा व वजनदार बनतो, त्याला चकचकीत रंग आणि दर्जेदार रूप मिळते. तसेच साठवणुकीदरम्यान होणारे नुकसान कमी होते आणि कांदा जास्त काळ टिकतो. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना बाजारात मिळणाऱ्या चांगल्या व स्थिर दराच्या रूपाने होतो.

महत्वाचा सल्ला : “कांद्याला खत देताना घाई नको, पण अचूक नियोजन हवे.” तसेच कोणतेही खत देताना अनुभवी किंवा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group