Fertilizer prices : यंदाच्या अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक आर्थिक संकट उभं राहिलं आहे. रासायनिक खतांच्या किमतींमध्ये प्रति बॅग तब्बल १०० ते २०० रुपयांची वाढ झाल्याने शेतीचा खर्च वाढला आहे. खरीप हंगामात नुकसान सहन केल्यानंतर आता रब्बी पेरणीसाठीही जादा खर्च करावा लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडत आहे.
खतांची मागणी वर्षानुवर्षे कमी-अधिक होत असली तरी उत्पादक कंपन्यांनी दरवाढीचं धोरण कायम ठेवल्याचं चित्र आहे. केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून काही खतांच्या किमती वाढवल्या असून, पुढील काळात बॅगमागे किमान ५० रुपयांची आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. कच्च्या मालाच्या आयातीतील घट आणि वाढलेली शेती करणाऱ्यांची संख्या (सुमारे ३३ टक्के) यांचा थेट परिणाम किमतींवर होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
येथे वाचा – कांद्याची आवक वाढली, दरात मोठे बदल..
खतांमध्ये झालेली दरवाढ (प्रति बॅग):
१०:२६:२६ – आधी ₹१७६०, आता ₹१९०० (₹१५० वाढ)
१४:३५:१४ – आधी ₹१८००, आता ₹१९५० (₹१५० वाढ)
१२:३२:१६ – आधी ₹१७५०, आता ₹१९०० (₹१५० वाढ)
२४:२४:०० – आधी ₹१८००, आता ₹१९०० (₹१०० वाढ)
८:२१:२१ – आधी ₹१८००, आता ₹१९७५ (₹१७५ वाढ)
९:२४:२४ – आधी ₹१९००, आता ₹२१०० (₹२०० वाढ)
पोटॅश – आधी ₹१६५५, आता ₹१८०० (₹१४५ वाढ)
दरवाढीमुळे रब्बी हंगामातील खर्च वाढणार असून, शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पुढील निर्णयांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.