कागदपत्रे रेडी ठेवा! नवी मुंबईत ‘या’ दिवशी सिडकोची मोठी लॉटरी..

CIDCO House Lottery : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको घरांबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या घोषणेनुसार, सिडकोच्या घरांच्या किमतीत थेट १० टक्क्यांची सवलत देण्यात आली असून, त्यामुळे घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे. विशेष म्हणजे, आता सिडकोच्या तब्बल १७ हजार घरांची लॉटरी जाहीर होणार असून, मुंबई आणि नवी मुंबईत घर (Flat in Navi Mumbai) घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना मोठी संधी मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाभ हजारो कुटुंबांना होणार असून, सभागृहात या निर्णयाचं सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

कोणत्या भागात मिळणार स्वस्त घरे?

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोकडून नवी मुंबईतील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरांची उभारणी करण्यात आली आहे. खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या परिसरात ही घरे उपलब्ध आहेत. एकूण १७ हजार घरांच्या किमती नव्या निर्णयानुसार १० टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहेत. ही सवलत विशेषतः EWS आणि LIG प्रवर्गातील घरांसाठी लागू राहणार असून, या घरांची लॉटरी आता पूर्ण केली जाणार आहे.

दोन महिन्यांत लॉटरी, कागदपत्रांची तयारी सुरू ठेवा

नवी मुंबई परिसर झपाट्याने विकसित होत असल्याने सिडकोची ही घरे नागरिकांसाठी अधिक आकर्षक ठरत आहेत. लॉटरीच्या माध्यमातून थेट मुंबई-नवी मुंबईत घर मिळवण्याची ही सुवर्णसंधी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच आवश्यक कागदपत्रांची तयारी करून लॉटरी प्रक्रियेसाठी सज्ज राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

येथे वाचा – घरांची लॉटरी लागली; मुंबईत BMC च्या लॉटरीत ही लोकं विजेते..

1 thought on “कागदपत्रे रेडी ठेवा! नवी मुंबईत ‘या’ दिवशी सिडकोची मोठी लॉटरी..”

Leave a Comment

Join WhatsApp Group