आता ई-पीक पाहणी करा नवीन पद्धतीने, मोबाईलची गरज नाही.. पहा फायद्याची बातमी..

E pik pahani : राज्यातील ‘ई-पीक पाहणी’ ॲपवर अद्याप पिकांची नोंदणी न करू शकलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आता या शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करण्याची संधी मिळणार असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि. १३) विधानसभेत ही महत्त्वाची घोषणा केली.

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन केलेल्या मागणीला महसूल विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या निर्णयामुळे आतापर्यंत नोंदणीपासून वंचित राहिलेल्या राज्यातील सुमारे २१ टक्के शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.

ऑफलाईन नोंदणीसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत

सभागृहात माहिती देताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, ‘ई-पीक पाहणी’ ॲपवर नोंदणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने पिकांची नोंदणी करता येणार आहे. तांत्रिक अडचणी, मोबाईलचा अभाव किंवा इंटरनेट समस्या यांमुळे अडलेली प्रक्रिया आता सुलभ होणार आहे. या कालावधीत शेतकरी तलाठी कार्यालयात किंवा कृषी सहाय्यकांच्या मदतीने आपल्या शेतातील पिकांची माहिती नोंदवू शकतील.

येथे वाचा – राज्यात अवकाळीची शक्यता आहे का? पहा पंजाब डख यांचा डिसेंबरचा हवामान अंदाज..

२१ टक्के शेतकरी नोंदणीपासून वंचित

ई-पीक पाहणी ॲप वापरताना अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडथळे, स्मार्टफोन नसणे किंवा नेटवर्क समस्या यांचा सामना करावा लागला. यामुळे राज्यातील जवळपास पाचपैकी एक शेतकरी या प्रक्रियेबाहेर राहिला होता. पीक नुकसान भरपाई, विविध शासकीय योजना तसेच पीक कर्जासाठी ई-पीक पाहणीची नोंदणी आवश्यक असल्याने, या शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती.

येथे वाचा – सोयाबीन भाव वाढले; पहा तुमच्या जिल्ह्यातील सोयाबीन भाव..

आमदार पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश

शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सातत्याने महसूल विभागाकडे पाठपुरावा केला होता. ऑफलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी अखेर मान्य झाल्याने, त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना पिकांची अचूक नोंदणी करता येणार असून, भविष्यात शासकीय योजना आणि आपत्कालीन मदत मिळवणे अधिक सोपे होणार आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group