कसा आहे तुमचा 1 BHK सॅम्पल फ्लॅट? CIDCO 1BHK Flat Sample Flat

हॉल आणि बेडरूम: घराच्या मुख्य दरवाजातून आत प्रवेश करताच एक सुंदर आणि प्रशस्त हॉल लागतो. हॉल आणि बेडरूम दोन्ही ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी (Ventilation) मोठ्या खिडक्या दिलेल्या आहेत.
किचनची रचना: स्वयंपाकघराची रचना अतिशय सुटसुटीत असून, तिथे फ्रिज ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा, सामानासाठी सज्जा आणि सुरक्षेच्या दृष्टीने फायर पॉईंटची विशेष व्यवस्था आहे.
बाथरूम आणि टॉयलेट: या फ्लॅटमध्ये तुम्हाला बाथरूम आणि वेस्टर्न स्टाईल टॉयलेट वेगवेगळे पाहायला मिळेल. सोबतच बाहेरच्या बाजूने वॉश बेसिनही बसवून देण्यात आले आहे.