शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे’ (PM Kisan) लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शासनाकडून पीएम किसान योजनेबाबत नुकतेच दोन मोठे अपडेट्स देण्यात आले आहेत. यातील एक बातमी शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक आहे, तर दुसरी बातमी काही शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणारी आहे. चला तर मग, सविस्तर जाणून घेऊया की कोणाच्या खात्यात थेट ६,००० रुपये जमा होणार आहेत आणि कोणाचे हप्ते कायमचे बंद होणार आहेत.
‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार रखडलेले ६,००० रुपये!
गेल्या काही महिन्यांपासून शासनाने पीएम किसान योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. एकाच घरात एकापेक्षा जास्त व्यक्तींनी लाभ घेणे किंवा जमिनीच्या फेरफाराच्या नोंदीत तफावत असणे, अशा कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांची खाती ‘संशयास्पद’ (Suspicious Accounts) यादीत टाकण्यात आली होती. यामुळे या शेतकऱ्यांचे १९ व्या हप्त्यापासूनचे पैसे मिळणे बंद झाले होते.
परंतु, शासनाने या शेतकऱ्यांना त्यांची खाती व्हेरिफाय (पडताळणी) करण्याची संधी दिली होती. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक (AgriStack) वर नोंदणी करून आपला ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) काढला आहे आणि पडताळणी प्रक्रियेत जे पात्र ठरले आहेत, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना त्यांचे रखडलेले २० वे, २१ वे आणि २२ वे असे सलग तीन हप्ते दिले जाणार आहेत. म्हणजेच, लवकरच या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ६,००० रुपये जमा होणार आहेत. विशेष म्हणजे, हे शेतकरी आता पात्र ठरल्यामुळे त्यांना राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चे हप्तेही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
येथे वाचा – पीक कर्जाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुम्हाला किती कर्ज मिळणार!
सावधान! ‘या’ शेतकऱ्यांचा २३ वा हप्ता होणार कायमचा बंद
एकिकडे रखडलेले पैसे मिळत असताना, दुसरीकडे मात्र शासनाने नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपला ‘फार्मर आयडी’ काढलेला नाही, त्यांच्यासाठी हा मोठा धोक्याचा इशारा आहे. कृषी मंत्रालयाने सर्व राज्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल किंवा ज्यांची खाती अद्याप संशयास्पद यादीतच आहेत, अशा शेतकऱ्यांचा आगामी २३ वा हप्ता कायमचा बंद केला जाईल.
फार्मर आयडी काढणे का आहे अनिवार्य?
शेतकरी मित्रांनो, आता काळ बदलला आहे आणि शासनाने सर्व योजनांसाठी नियम कडक केले आहेत. फक्त पीएम किसान योजनाच नाही, तर कर्जमाफी, पीक विमा आणि इतर कोणत्याही सरकारी कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर आयडी’ असणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांची ‘ॲग्रीस्टॅक’ प्रणालीवर नोंदणी झालेली असेल, त्यांनाच यापुढे २३ वा हप्ता दिला जाणार आहे.
येथे वाचा – तुमच्या जिल्ह्यात कोणत्या पिकाला पीकविमा मिळणार? पहा खरी माहिती
शेतकऱ्यांनी आता काय करावे?
जर तुम्ही अद्याप तुमचा फार्मर आयडी काढलेला नसेल, तर कोणत्याही विलंबाविना तो त्वरित काढून घ्या.
यामुळे तुमचे येणारे हप्ते सुरक्षित राहतील आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
जर तुम्ही पडताळणी पूर्ण केली असेल आणि तुमचे रखडलेले पैसे खात्यात जमा झाले असतील, तर नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही याची माहिती मिळेल.