ladki bahin yojana latest news : राज्यात सध्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’संदर्भात राज्य शासनाने एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांचे पैसे काही कारणास्तव अचानक येणे बंद झाले आहेत, त्यांच्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. शासनाने ई-केवायसी (E-KYC) दुरुस्तीसाठी आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तुमचेही अडकलेले पैसे पुन्हा मिळवायचे असतील, तर महिलांनी हे काम दिलेल्या मुदतीत लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.
काय आहे नेमका बदल आणि मुदतवाढ?
अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण केली होती, मात्र ती करत असताना त्यात काही तांत्रिक चुका झाल्यामुळे त्यांचे हप्ते अचानक थांबले होते. या चुका सुधारण्यासाठी शासनाने सुरुवातीला ३१ मार्च २०२६ पर्यंतची मुदत दिली होती. परंतु, अजूनही अनेक महिलांची दुरुस्ती बाकी असल्याने आणि विविध संस्था व महिलांनी केलेल्या निवेदनांची दखल घेत, आता ई-केवायसी दुरुस्तीची ही मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
७१ लाख महिला लाभापासून वंचित
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, सध्या राज्यातील तब्बल ७१ लाखांपेक्षा जास्त महिला या योजनेच्या हप्त्यांपासून वंचित आहेत. यामागे दोन मुख्य कारणे आहेत: एक म्हणजे केवायसी मधील चुका आणि दुसरे म्हणजे ई-केवायसी अजिबात न करणे. या ७१ लाख महिलांपैकी जवळपास ६० ते ६५ लाख महिला अशा आहेत, ज्यांनी अद्याप आपली ई-केवायसी केलेलीच नाही.
येथे वाचा – राज्यात पुन्हा गारपीटीची शक्यता; शेतकऱ्यांनो ही तारीख लक्षात ठेवा
ज्यांची ई-केवायसी अजिबात झालेली नाही त्यांच्यासाठी काय?
ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेलीच नाही, त्यांना सध्या पोर्टलवर दुरुस्ती करता येत नाही. त्यांना ‘तुमचा नंबर आधारच्या यादीत किंवा दुरुस्तीच्या यादीत नाही’ असे मेसेज येत आहेत. या महिलांसाठी सध्या कोणतीही नवीन केवायसी प्रक्रिया सुरू नाही. सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार (GR), ई-केवायसीची नवीन प्रक्रिया आता थेट जून २०२६ मध्ये सुरू होणार आहे. नवीन केवायसीसाठी किमान ८ ते १५ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी शासनाकडे सातत्याने करण्यात आली होती. मात्र, महिला व बालविकास विभाग किंवा राज्य शासनाने या मागणीवर सध्या तरी कोणताही सकारात्मक विचार केलेला नाही. त्यामुळे ज्यांची केवायसी पूर्णपणे बाकी आहे, त्यांना आता जून महिन्यापर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.
पीकविमा मोबाईलवर तपासा; येथे क्लिक करून पहा सोपी पद्धत
तातडीने करा हे काम!
ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे परंतु केवळ काही किरकोळ चुकांमुळे किंवा दुरुस्तीअभावी पैसे अडकले आहेत, त्यांनी ३० एप्रिल २०२६ पूर्वी आपल्या अर्जात त्वरीत दुरुस्ती करून घ्यावी. ही दुरुस्ती वेळेत पूर्ण केल्यास तुमचे थांबलेले हप्ते पुन्हा सुरळीतपणे तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल.
