मुंबईकरांना लागली 1 लाख घरांची लॉटरी; या लोकांना मिळणार मुंबईत घर

Mumbai Housing : मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं, हे प्रत्येक मुंबईकराचं सर्वात मोठं स्वप्न असतं. पण गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न अनेकदा अपूर्णच राहतं. अशातच आता राज्य सरकारने एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा करत जणू १ लाख घरांची बंपर लॉटरीच काढली आहे! पण सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे, ही घरे नेमकी कुणाला मिळणार? चला तर मग, या ऐतिहासिक निर्णयाची सविस्तर माहिती घेऊया.

या लोकांना मिळणार मुंबईत हक्काचे घर!

मुंबईला खऱ्या अर्थाने आकार दिला तो इथल्या रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या गिरणी कामगारांनी. याच गिरणी कामगारांसाठी ही १ लाख घरांची लॉटरी लागली आहे. मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलूनही हा कामगार वर्ग हक्काच्या घरासाठी गेली अनेक वर्षे संघर्ष करत होता. अखेर त्यांच्या या दीर्घ लढ्याला यश आले असून, राज्य सरकारने मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गिरणी कामगारांसाठी तब्बल १ लाख घरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

येथे वाचा – मुंबईकरांनो लागा तयारीला! 10-15 दिवसांत म्हाडाकडून 2500 घरांची लॉटरी, अशी करा तयारी

कशी आणि कुठे झाली ही घोषणा?

• ​विधान परिषदेत अधिकृत माहिती: राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या अधिवेशनात या महत्त्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
• ​प्रश्नाला सविस्तर उत्तर: विधान परिषदेत आमदार सचिन अहिर यांनी गिरणी कामगारांच्या प्रलंबित घरांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले होते. यावर अधिकृत उत्तर देतानाच सरकारने गिरणी कामगारांसाठी १ लाख घरांची निर्मिती करण्यात येणार असल्याची ग्वाही सभागृहात दिली.

येथे वाचा – मुंबईत म्हाडाची अत्यल्प गटासाठी घरे वाढली; या प्राईम लोकेशनवर घरे

या निर्णयाचे महत्त्व काय?

• ​अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार: गिरण्या बंद पडल्यापासून अनेक कामगारांना हलाखीचे जीवन जगावे लागत होते. आता त्यांना स्वतःच्या हक्काचे छत मिळणार असल्याने त्यांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे.
• ​कष्टाची पावती: हा केवळ घरांचा निर्णय नसून, मुंबई शहरासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणाऱ्या कष्टकऱ्यांच्या श्रमाचा हा खरा सन्मान आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group