Crop Insurance 2025 : शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे! गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या खरीप पीकविम्याची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो, तो अखेर मंजूर झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार, हा मोठा प्रश्न होता. पण आता शासनाच्या पोर्टलवर पीकविम्याचे स्टेटस दिसण्यास सुरुवात झाली आहे. चला तर मग, तुमच्या खात्यात विम्याचे पैसे जमा होणार की नाही आणि हे मोबाईलवर कसे तपासायचे, हे सविस्तर जाणून घेऊया.
कोणत्या पिकांचा विमा जमा होणार?
सुरुवातीला १६ मार्चपासून विम्याचे कॅल्क्युलेशन दिसणार असे सांगण्यात आले होते. त्यात थोडा उशीर झाला असला तरी, १९ तारखेपासून शेतकऱ्यांना आकडे दिसू लागले आहेत. सध्या पोर्टलवर प्रामुख्याने मूग, उडीद, सोयाबीन आणि मका यांसारख्या पिकांची माहिती अपडेट झाली आहे. मात्र, जर तुम्ही तूर आणि कापूस या पिकांसाठी विमा काढला असेल, तर तुम्हाला थोडी आणखी वाट पाहावी लागेल. या पिकांचे स्टेटस सध्या ‘Awaited’ (प्रलंबित) असे दाखवत आहे.
तुमचा विमा मंजूर झालाय की नाही? हे कसे समजायचे?
पोर्टलवर तपासताना तुम्हाला तीन प्रकारच्या नोंदी दिसू शकतात:
रक्कम दिसणे: जर तुम्हाला तिथे विम्याची काही रक्कम (Calculation) दिसत असेल, तर अभिनंदन! याचा अर्थ तुमचा पीकविमा मंजूर झाला आहे.
शून्य (Zero) दिसणे: जर तिथे कॅल्क्युलेशन ‘शून्य’ दाखवत असेल, तर दुर्दैवाने तुमच्या भागात किंवा महसूल मंडळात पीकविमा मंजूर झालेला नाही.
Awaited (प्रलंबित): याचा अर्थ अजून तुमच्या पिकाचे कॅल्क्युलेशन झालेले नाही. त्यासाठी काही दिवस थांबावे लागेल.
येथे वाचा – ग्रामपंचायत निवडणूक जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक
मोबाईलवर पीकविमा कसा चेक करायचा? (अगदी सोपी पद्धत)
तुम्ही कोणत्याही सीएससी (CSC) सेंटरवर न जाता स्वतःच्या मोबाईलवर अवघ्या दोन मिनिटांत हे तपासू शकता:
१. गुगलवर जाऊन PMFBY (प्रधानमंत्री पीक विमा योजना) सर्च करा आणि अधिकृत वेबसाईट उघडा.
२. तिथे ‘Farmer Login’ या पर्यायावर क्लिक करा.
३. तुमचा मोबाईल नंबर आणि त्यावर आलेला OTP टाकून लॉगिन करा. (एकाच नंबरवर अनेक पॉलिसी असतील तर आधार नंबर वापरून लॉगिन करावे लागेल).
४. त्यानंतर ‘Kharip 2025’ हे वर्ष निवडा.
५. तुमची पॉलिसी सिलेक्ट करा आणि त्याखालील ‘View’ या बटनावर क्लिक करा.
६. इथे तुम्हाला विम्याची मंजूर झालेली रक्कम स्पष्टपणे दिसेल.
कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक फायदा होणार?
यंदा अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ज्या जिल्ह्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, तिथे विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे. यात नांदेड, अमरावती, यवतमाळ, धाराशिव, सोलापूर, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच, शासनाने जाहीर केलेल्या ८२ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळू शकतो.