Dairy Farming Subsidy : शेतकरी मित्रांनो, दुग्धव्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवलाचं टेंशन आहे? पशुखाद्याचे वाढलेले दर आणि दुधाचे पडलेले भाव यामुळे अनेकदा गणित जुळत नाही. पण आता काळजी नको! शासनाने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक जबरदस्त योजना आणली आहे. यात तुम्हाला फक्त गाई-म्हशीच नाही, तर त्यांची भविष्यातील पिढी (कालवड) आणि अगदी चारा कापण्याची मशीन सुद्धा अनुदानावर मिळणार आहे. जाणून घेऊया या योजनेची ‘इत्थंभूत’ माहिती आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत!
दुग्धव्यवसायाला मिळणार ‘बुस्टर डोस’..
बऱ्याचदा तरुण शेतकरी उत्साहाने दुग्धव्यवसाय सुरू करतात, पण महागडी जनावरं आणि पशुखाद्याच्या वाढत्या दरांमुळे हा व्यवसाय तोट्यात जातो. नेमकी हीच अडचण ओळखून शासनाने ‘विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प (VMDP) – टप्पा २’ सुरू केला आहे.
ही योजना २०२४-२५ ते २०२७-२८ या चार वर्षांसाठी राबवली जाणार असून, तिचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या खिशाल कात्री न लावता दुधाचे उत्पादन वाढवणे हा आहे.
तुम्हाला नेमकं काय आणि किती अनुदान मिळणार?
या योजनेचं स्ट्रक्चर अतिशय फायदेशीर बनवण्यात आलं आहे. अनुदानाची टक्केवारी वाचून तुम्ही नक्कीच खुश व्हाल:
१. दुधाळ गाई/म्हशी: तुम्हाला नवीन गाय किंवा म्हैस खरेदी करायची असेल, तर शासनाकडून ५०% अनुदान मिळेल. अर्धी रक्कम शासन भरणार!
२. गाभण कालवड (Heifer): ही या योजनेची सर्वात जमेची बाजू आहे. जर तुम्ही गाभण कालवड घेतली, तर त्यावर ७५% अनुदान आहे. म्हणजे भविष्यातील दुधाळ जनावर तुम्ही नाममात्र किंमतीत तयार करू शकता.
३. कडबा कुट्टी यंत्र (Chaff Cutter): जनावरांना चारा देण्यासाठी लागणाऱ्या या मशीनवर ५०% अनुदान आहे.
४. मुरघास (Silage): जनावरांच्या पोषणासाठी मुरघास निर्मितीवर २५% अनुदान मिळेल.
तसेच, पशुखाद्य, फॅट वाढवण्यासाठी पूरक खाद्य आणि प्रजनन पूर्व खाद्यावरही अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
येथे वाचा – जानेवारीत गारपीट होणार? पहा पुढील दीड महिन्याचा हवामान अंदाज..
ही योजना कोणासाठी? (पात्रता)
ही योजना खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी आहे. जर तुम्ही या भागातील रहिवासी असाल आणि तुमच्याकडे पशुपालन करण्याची सोय असेल, तर तुम्ही या योजनेचे लाभार्थी होऊ शकता.
अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे ठेवा तयार..
अर्ज ऑनलाइन भरायचा असल्याने वेळेवर धावपळ नको. खालील कागदपत्रे स्कॅन करून (किंवा मोबाइलमध्ये फोटो काढून) तयार ठेवा:
आधार कार्ड: दोन्ही बाजूंचा फोटो (एकाच पेजवर दिसेल असा).
रेशन कार्ड: पहिल्या आणि शेवटच्या पानाचा फोटो (किंवा QR कोड असलेले रेशन कार्ड). कुटुंबातील इतर ३ सदस्यांचे आधार नंबरही सोबत ठेवा.
बँक पासबुक: अनुदानाची रक्कम जमा होण्यासाठी.
जनावरांचा टॅग नंबर (असल्यास): तुमच्याकडे आधीच जनावरं असतील तर त्यांचा १२ अंकी टॅग नंबर (Animal ID).
दूध प्रमाणपत्र: तुम्ही ज्या डेअरीला दूध घालता, तिथला ‘पेअर कोड’ (Payer Code) किंवा प्रमाणपत्र.
येथे वाचा – जानेवारीपासून रेशन वाटपात बदल होणार; ‘आता’ एवढे धान्य मिळणार..
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
कुठल्याही एजंटच्या मागे धावण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः मोबाइलवर किंवा लॅपटॉपवर अर्ज भरू शकता.
१. वेबसाईट: सर्वात आधी www.vmddp.com या अधिकृत वेबसाईटवर जा.
२. नोंदणी: ‘आता नोंदणी करा’ या पर्यायावर क्लिक करा.
३. माहिती भरा: अर्जाचे ५ टप्पे आहेत – मूलभूत माहिती, पात्रता, घटक निवड, बँक तपशील आणि सबमिशन.
४. कागदपत्रे अपलोड: वर सांगितलेली कागदपत्रे स्पष्ट दिसतील अशी अपलोड करा.
५. घटक निवड: तुम्हाला गाय हवी आहे, मशीन हवी आहे की अजून काही, ते तिथे निवडा (तुमच्याकडील जनावरांच्या संख्येनुसार काही पर्याय उपलब्ध होतील).
६. सबमिट: शेवटी माहिती एकदा तपासून अर्ज सबमिट करा.
महत्त्वाची टीप: अर्जामध्ये काही तांत्रिक अडचण आली किंवा काही समजलं नाही, तर तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकारी (LDO) यांच्याशी नक्की संपर्क साधा. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.