दुष्काळ जाहीर तालुक्यांची यादी आणि शेतकऱ्यांसाठी १२ मोठ्या सवलती (Drought Declared Taluka List 2026)
शेतकरी मित्रांनो, मागील पेजवरून आल्याबद्दल धन्यवाद! चला तर मग जाणून घेऊया दुष्काळाच्या त्या १२ मोठ्या सवलती आणि जाहीर झालेल्या जिल्ह्यांची सविस्तर माहिती:

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या १२ विशेष सवलती (उपाययोजना):
१. जमीन महसुलात सूट: शेतकऱ्यांना जमीन महसूल भरण्यापासून सवलत.
२. कर्ज वसुलीला स्थगिती: शेतीशी निगडित सर्व कर्जांच्या वसुलीला तात्काळ स्थगिती.
३. पीक कर्जाचे पुनर्गठन: जुन्या पीक कर्जाचे पुनर्गठन (Restructuring) करण्याची सुविधा.
४. वीज बिलात सूट: कृषी पंपाच्या (साडे सात HP च्या वरील) चालू वीज बिलात ३३.५% सूट.
५. वीज जोडणी खंडित न करणे: टंचाईग्रस्त गावात शेती पंपाची वीज जोडणी कापली जाणार नाही.
६. परीक्षा शुल्क माफी: शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात (Exam Fee) संपूर्ण माफी.
७. रोजगार हमी योजनेत शिथिलता: मनरेगाच्या कामाच्या अटींमध्ये शिथिलता.
८. पाण्याचे टँकर: पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या ठिकाणी टँकरची व्यवस्था.
९. जनावरांसाठी चारा छावण्या: आवश्यकतेनुसार जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय.
१०. जलसंधारण कामे: पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी विशेष कामे.
११. शेतमजूर कल्याण: शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू न देण्याची काळजी.
१२. इतर विशेष मदत: टंचाई परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक स्तरावर विशेष उपाययोजना.

दुष्काळ जाहीर झालेले जिल्हे (एकूण ३४ जिल्हे व 304 तालुके):
(येथे प्रमुख जिल्ह्यांचा थोडक्यात आढावा दिलेला आहे)
मराठवाडा:
छत्रपती संभाजीनगर (कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री), जालना (सर्व तालुके), बीड (सर्व तालुके), लातूर (१० तालुके), धाराशिव (सर्व ८ तालुके), नांदेड (१६ तालुके), परभणी (९ तालुके), हिंगोली (५ तालुके).
पश्चिम महाराष्ट्र व कोकण:
पुणे (भोर, वेल्हे, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, आंबेगाव, जुन्नर), सोलापूर (११ तालुके), सांगली, सातारा, कोल्हापूर मधील बहुतांश तालुके. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी ६ व ८ तालुके. (टीप: ठाणे जिल्ह्यात एकही तालुका नाही).
उत्तर महाराष्ट्र:
नाशिक (१३ तालुके), जळगाव (१४ तालुके), धुळे (४ तालुके), नंदुरबार (५ तालुके), अहिल्यानगर/अहमदनगर (१४ तालुके).
विदर्भ:
बुलढाणा (१३ तालुके), अमरावती (१४ तालुके), अकोला, वाशिम, यवतमाळ (१६ तालुके), वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर (१५ तालुके), आणि गडचिरोली (२ तालुके).
(हा सविस्तर शासन निर्णय (GR) आणि संपूर्ण ३०५ तालुक्यांची यादी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.)

महत्त्वाची टीप: शेतकरी मित्रांनो, जर तुमचा तालुका या यादीत असेल, तर तुम्हाला या १२ सवलतींचा नक्की लाभ मिळेल. या संदर्भातील पुढील कार्यवाही लवकरच स्थानिक प्रशासनाकडून सुरू केली जाईल.