पुणे म्हाडा लॉटरीचे नवीन वेळापत्रक

अर्ज आणि ऑनलाईन पेमेंटची नवीन मुदत:
पूर्वी १५ ऑक्टोबर असलेली अंतिम तारीख आता वाढवण्यात आली असून, आता तुम्हाला नव्याने अर्ज करण्यासाठी आणि ऑनलाईन पेमेंट (उदा. UPI, Credit/Debit Card) करण्यासाठी २२ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) वेळ देण्यात आला आहे.

२. RTGS/NEFT द्वारे बँकेत पेमेंट:
जर तुम्हाला बँकेत जाऊन आरटीजीएस (RTGS) किंवा एनईएफटी (NEFT) द्वारे अनामत रक्कम भरायची असेल, तर त्यासाठी २३ ऑक्टोबर २०२६ (दुपारी ४:०० वाजेपर्यंत) मुदत देण्यात आली आहे. (बँकेच्या वेळेनुसार)

३. पहिली प्रारूप यादी (First Draft List):
सर्व प्राप्त अर्जांची पडताळणी झाल्यानंतर म्हाडाची पहिली प्रारूप यादी २० नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता प्रसिद्ध केली जाईल.

४. अंतिम प्रारूप यादी (Final Draft List):
पहिल्या यादीवर काही हरकती किंवा आक्षेप असल्यास ते सोडवल्यानंतर, लॉटरीसाठी पात्र असलेल्यांची अंतिम यादी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता जाहीर केली जाईल.

५. लॉटरीची मुख्य सोडत (Draw Date):
ज्या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत, ती म्हाडा पुणे लॉटरीची मुख्य सोडत ४ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता काढण्यात येईल आणि निकाल जाहीर होईल.

६. अनामत रक्कम परतावा (Refund of Deposit):
ज्या अर्जदारांचा नंबर या लॉटरीत लागणार नाही, त्यांनी भरलेली अनामत रक्कम (EMD) १० डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १०:४५ वाजल्यापासून परत मिळण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होईल. ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास पुढील ८ ते १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो.

अर्जदारांसाठी महत्त्वाची टीप:
ज्यांना डॉक्युमेंट्स काढायला, व्हेरिफाय करायला किंवा ऑनलाईन अपलोड करायला अडचण आली होती, त्यांच्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. कृपया पुन्हा शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर तुमची प्रोफाईल आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्या.