पुणे महानगरपालिकेतील म्हाडाचे टॉप ५ लोकेशन्स (MHADA Pune Lottery Top 5 Locations – PMC)

१. बाणेर (Baner):
बाणेर हा आता पुण्यातील सर्वात वेगाने विकसित होणारा हायफाय भाग बनला आहे. हा भाग हायवेपासून जवळ असल्यामुळे आणि इथे अनेक नवीन प्रकल्प येत असल्यामुळे बाणेरला खूप महत्त्व आले आहे. पुढील २-३ वर्षांत येथील घरांचे दर गगनाला भिडलेले असतील.
उपलब्ध प्रकल्प: नॅन्सी हिल, रिजनसी अस्त्र, बी हॅबिटॅट आणि सी निर्वाणा.
घरे आणि किमती: इथे १ BHK (सुमारे २१ ते २२ लाख) आणि २ BHK (२२ ते २७ लाखांपर्यंत) घरे उपलब्ध आहेत.
२. खराडी (Kharadi):
खराडी म्हणजे आयटीयन्सची (IT) पहिली पसंती! इऑन आयटी पार्क (EON IT Park) मुळे येथील घरांचे भाव आणि भाडे खूप जास्त आहे. जर तुम्हाला गुंतवणुकीसाठी किंवा भाड्याने देण्यासाठी घर हवे असेल तर खराडी बेस्ट आहे.
उपलब्ध प्रकल्प: झेन इलाईट (फक्त ३ घरे उपलब्ध).
घरे आणि किमती: १ BHK (सुमारे १३.८९ लाख ते १५.४० लाखांपर्यंत).
३. हडपसर (Hadapsar):
मगरपट्टा सिटीमुळे हडपसर आणि आजूबाजूच्या परिसराला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक नामांकित बिल्डर्सचे प्रकल्प इथे येत आहेत. नोकरदारांसाठी हे लोकेशन अतिशय सोयीचे आहे आणि म्हाडाचे इथे भरपूर प्रकल्प आहेत.
उपलब्ध प्रकल्प: स्टेला, यशराज नक्षत्र (येथे २४ घरे उपलब्ध), आणि युरोफिक ब्लाझम (येथे १ BHK ची तब्बल ६२ घरे आहेत).
घरे आणि किमती: १ BHK घरे साधारण १६ ते १७ लाखांच्या घरात आहेत, तर २ BHK २१ ते २५ लाखांपर्यंत मिळतील.
४. मुंढवा (Mundhwa):
जर तुम्हाला प्रॉपर पुण्याशी कनेक्ट राहायचे असेल आणि भाड्यातून चांगले रिटर्न हवे असतील, तर मुंढवा हा एक उत्तम पर्याय आहे. मुंढवा सिटी आता पूर्ण डेव्हलप झाली असून बाजूच्या भागात नवीन प्रकल्प उभे राहत आहेत.
उपलब्ध प्रकल्प: अमारा केशवनगर (नदी किनारी व शांत ठिकाण), अतुल्यम (EWS/LIG साठी), आणि उन्नती.
घरे आणि किमती: इथे EWS साठी १६ लाखांपासून (१ आरके/१ बीएचके) घरे सुरू होतात, तर २ BHK घरे साधारण २१ ते २८ लाखांपर्यंत उपलब्ध आहेत.
५. लोहगाव (Lohgaon):
पुणे विमानतळाच्या (Airport) जवळ असल्यामुळे लोहगाव आता झपाट्याने विकसित होत आहे. येथील अनेक प्रकल्प एअरपोर्टपासून अवघ्या २-३ किलोमीटरच्या परिघात आहेत. भविष्यातील गुंतवणुकीसाठी लोहगावला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
उपलब्ध प्रकल्प: प्रसुन्न इलारा (४२ घरे), माईंड स्पेस रेसिडन्सी, आणि मैत्री मिडोज (येथे तब्बल ६९ घरे उपलब्ध आहेत).
घरे आणि किमती: १ BHK साधारण २१ लाखांपासून सुरू, तर २ BHK घरे २५ ते २९ लाखांपर्यंत उपलब्ध आहेत.

महत्त्वाची टीप: हे लोकेशन्स जरी टॉप ५ असले तरी, अर्ज करण्यापूर्वी तुमचे ऑफिस, जॉब आणि तुमच्या सोयीनुसार निर्णय घ्या.