कमी पाण्यात येणारे टॉप ५ हरभरा बियाणे (Harbhara Biyane 2026)

१. विजय (Vijay):
अतिशय उत्कृष्ट आणि कमी पाण्यात येणारी ही व्हरायटी आहे. पेरणी करताना जमिनीत फक्त उगवणीपुरता ओलावा असेल, तरी हे बियाणे तग धरून चांगले उत्पादन देऊ शकते. कमी पावसाच्या परिस्थितीतही या वाणाकडून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा ठेवली जाते.
२. राजविजय / आरवीजी २०४ (RVG 204):
खास करून कोरडवाहू क्षेत्रासाठी हे वाण अत्यंत उपयुक्त आहे. लागवडीसाठी एकरी २० ते २५ किलो बियाणे लागते. ज्यांच्याकडे पाण्याची सोय कमी आहे, त्यांनी या वानाचा लागवडीसाठी नक्की विचार करावा.
३. फुले विश्वराज (Phule Vishwaraj):
कमी पाण्यावर येणाऱ्या वाणांमध्ये फुले विश्वराज हे एक अतिशय उत्तम नाव आहे. या वानाचाही तुम्ही लागवडीसाठी नक्कीच विचार करू शकता.
४. जाकी ९२१८ (JAKI 9218):
जर तुमच्याकडे एक-दोन पाणी देण्याची सोय असेल (थोडं बागायती क्षेत्र), तर हे वाण उत्कृष्ट आहे. मर रोगाला हे वाण बऱ्यापैकी सहनशील आहे आणि याची फुटवे करण्याची क्षमता खूप चांगली आहे. (याचे दाणे थोडे छोटे असतात).
५. दप्तरी २१ (Daptari 21):
सध्या भरपूर शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले आणि व्हायरल झालेले हे वाण आहे. जमिनीच्या प्रकारानुसार याचा फुटवा खूप चांगला होतो. त्यामुळे या वाणाची तुम्ही नक्की निवड करू शकता.

काही विशेष माहिती आणि वाण:
मशीनने (हार्वेस्टरने) काढणीसाठी: जर तुम्हाला हरभरा मजुरांऐवजी हार्वेस्टरने काढायचा असेल, तर ‘फुले विक्रम’ या वाणाची निवड करा. याची उंची जमिनीपासून थोडी जास्त असते आणि घाटे वर लागतात, त्यामुळे हार्वेस्टरने काढणी सोपी होते.

काबुली / डॉलर हरभरा: जर तुमच्याकडे ड्रीपची सोय असेल आणि ३ ते ४ पाणी देण्याची व्यवस्था असेल, तर तुम्ही पीकेव्ही ४ (PKV 4), पीकेव्ही २, किंवा फुले कृपा या डॉलर हरभऱ्याची लागवड करू शकता. डॉलर हरभरा नेहमी टोकन यंत्राने बेडवर लावावा, यामुळे उत्पादन चांगले मिळते.