शेतकरी मित्रांनो, पंजाब डख यांच्या नवीन अंदाजानुसार राज्यात २० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या दरम्यान परतीचा पाऊस पडणार आहे. दसऱ्यानंतर सुरू होणारा हा पाऊस सलग चार ते पाच दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागांत मुक्काम करेल. हा पाऊस प्रामुख्याने तेलंगणा आणि कर्नाटकमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे.
बाजारातील ट्रिक्स शिका आणि आपल्या शेतमालाला जास्त भाव मिळवा, इथे क्लिक करून ई-बुक डाऊनलोड करा
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस?
हा पाऊस राज्याला कव्हर करणार असून सुरुवातीला खालील जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल:
सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा
अहिल्यानगर (अहमदनगर), बीड, लातूर, धाराशिव
नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि वाशिम
त्यानंतर हा पाऊस पुढे सरकेल आणि जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पोहोचेल. परतीच्या पावसाचे स्वरूप सगळीकडे सारखे नसते; काही भागात पाणी साचेल इतका पाऊस पडेल, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस होईल.
बाजारातील ट्रिक्स शिका आणि आपल्या शेतमालाला जास्त भाव मिळवा, इथे क्लिक करून ई-बुक डाऊनलोड करा
कडाक्याची थंडी कधी सुरू होणार?
रब्बी पिकांसाठी थंडी खूप महत्त्वाची असते. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १३ नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होईल. तसेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे.